📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या हस्ते आदित्य शिक्षण संस्थेच्या श्रींची आरती

पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या हस्ते आदित्य शिक्षण संस्थेच्या श्रींची आरती
विद्यार्थांनसोबत साधला मनमोकळा संवाद, संस्थेच्या वतीने एपींचा सन्मान
———
प्रतिनिधी | बीड जिवनात शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासणे महत्वाचे आहे, “गणपती उत्सवाप्रमाणे आपले जीवनही आनंदी आणि उत्साही असावं. ताणतणावात जगण्याऐेवजी तणावमुक्त जीवन जगणं हीच खरी प्रगती आहे. असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी केले. ते आदित्य शिक्षण संस्थेमध्ये श्रींच्या आरती प्रसंगी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना बोलत होते. यावेळी संस्थेच्या वतीने संचालक डॉ.आदित्य सारडा,आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा, सी. ए. गिरीशजी गिल्डा यांनी एसपी नवनित कॉवत यांचा सत्कार केला.
आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून मंगळवारी पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या हस्ते श्रींच्या आरतीचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी आदित्य डेंटल कॉलेज चे प्राचार्य डॉ.हिमांशू , आदित्य आयुर्वेद चे प्राचार्य डॉ. विवेक कुलकर्णी, आदित्य कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा, आदित्य कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीश कचरे, आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल सानप, आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास गर्जे, आदित्य फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.बालाजी बहिरवाल यांच्यासह सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थांना मार्गदर्शनही केले. त्यांनी जीवनात एकोपा, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याचे महत्व विद्यार्थांना पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “गणपती उत्सवाप्रमाणे आपले जीवनही आनंदी आणि उत्साही असावं. ताणतणावात जगण्याऐेवजी तणावमुक्त जीवन जगणं हीच खरी प्रगती आहे.” प्रसंगी विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षकांना यांच्याशी मनमोकळा संवाद साधत त्यांना विविध सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती विचारली. महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनाबाबतची रांगोळी काढून मान्यवरांचे स्वागत केलं. पोलिस अधीक्षक यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

माणूस उभा आहे वर्दीतला, म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला
—-
आदित्य शिक्षण संस्थेच्या वतीने पोलिसांची कार्यतत्परता आणि कर्तव्य कठोरता दाखवणार रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीतून माणूस उभा आहे वर्दीतला, म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला हा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला होता. ही रांगोळी पाहुण पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक करत पोलिसांप्रति असलेली संवेदना रांगोळीतून मांडल्याबद्दल मला आनंद झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Back to top button