राजकीय

कोरोनामुळे नाही तर धुळीपासून संरक्षणासाठी लोक मास्क वापरतात

 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना तेथील रस्त्याच्या मुद्दयावरून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षावर घणाघाती टीका केली आहे. सध्या कल्याण डोंबिवलीत रस्त्याच्या खांद्यावरुन अँग्रिक त्रस्त असताना आता पसरलेल्या धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रचंड खड्डे हे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता पाऊस कमी झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली मधील जनता आता कोरोनामुळे नाही तर धुळीमुळे मास्क वापरत असल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विधान केले आहे.

कल्याण डोंबिवली मधील रस्त्याची हि चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे आणि धुळीमुळे आता अपघात देखील घडू लागले आहेत.मात्र अस असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कल्याण डोंबिवली मध्ये प्रचंड धुळीचे आणि खड्डयांचे साम्राज्य तयार झाले आहे.त्यामुळे मनसेचे कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांना लक्ष केले आहे.

Back to top button