महाराष्ट्र

अयोध्या दौऱ्यानंतर भाजप-मनसे युतीची शक्यता ?

 

राज्यात शिवसेना पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर काडीमोड घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हात मिळवली केली होती तर दुसरीकडे हिदुत्वादाच्या मुद्दयावरून भाजपा आणि मनसे जवळ येत असल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे. त्यातच लवकरच राज ठाकरे हे आयोडायचा दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

तसेच आता आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसे आणि भाजप युतीसाठी हात मिळवणी करताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आगामी काळातील अयोध्या दौरा झाल्यानंतर युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नक्कीच सेनेनला याचा फटका बसणार आहे.

ठाणे महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक तीन सदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवीन प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. ही रचना जुन्या पद्धतीने म्हणजेच मागील झालेल्या जणगणनेनुसार प्रभागांची रचना करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत.

Back to top button