बीड

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बीडमध्ये महत्त्वपूर्ण बैठक!

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बीडमध्ये महत्त्वपूर्ण बैठक!
*सर्व इच्छुक उमेदवार तथा शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे- अनिलदादा जगताप*
====================
बीड, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेब, मराठवाडा संपर्क मंत्री ना. संजयजी शिरसाट साहेब व मराठवाडा संपर्क नेते अर्जुन खोतकर साहेब यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन साहेब आणि जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी 11: 00 वा. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जालना रोड बीड येथे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याच्या ध्यासाने शिवसेनेची महत्त्वपूर्ण रणनीती बैठक आयोजित कारण्यात आली आहे .
या बैठकीत शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार असून यावेळी प्रभाग निहाय उमेदवार, प्रचार योजना, जनसंपर्क अभियान आणि स्थानिक स्तरावरील रणनीतीवर सखोल चर्चा होईल. या बैठकीस सर्व इच्छुक उमेदवार यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, युवासेना व सर्व अंगीकृत संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, सचिन भैय्या मुळूक, स्वप्निल भैय्या गलधर आणि चंद्रकांत नवले यांनी केले आहे.
°°°°°
Back to top button