भाजप जामखेड शहर मंडल चिटणीस पदी विजय कुलकर्णी यांची निवड

भाजप जामखेड शहर मंडल चिटणीस पदी विजय कुलकर्णी यांची निवड
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील कुंभार तळे येथील रहिवासी आणि समाजहिताच्या कामात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते विजय अरविंद कुलकर्णी यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी जामखेड शहर मंडल चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
समाजातील विविध प्रश्नांवर सक्रियपणे काम करणारे कुलकर्णी हे जामखेड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच स्व. विठ्ठल (आण्णा) राऊत (संस्थापक अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ पुणे तथा : राष्ट्रीय उपाध्यक्ष :- प्रजापती कुंभकार महासंघ ,नवी दिल्ली) यांच्या कार्याने प्रेरित होऊन सामाजिक कामाच्या प्रवासास सुरुवात केली.
कुलकर्णी यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले.माजी आमदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यकाळात तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावत पक्षासाठी निष्ठेने योगदान दिले.तसेच गणेशोत्सव, नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन व शहरात विविध प्रश्नांना सामोरे जात सामाजिक कामे केली आहेत.
याच कार्याचा गौरव म्हणून भाजप जामखेड शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद यांनी विजय कुलकर्णी यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीबद्दल शहर व तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकांच्या संपर्कात राहून सदैव सहकार्याची भावना जपणारा एक उमदा आणि कार्यक्षम कार्यकर्ता म्हणून कुलकर्णी यांनी शहरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
आगामी काळातही पक्षाच्या ध्येयधोरणाशी एकनिष्ठ राहून संघटन मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार तसेच माझी सामाजिक कारकिर्द व सध्या राजकीय क्षेत्रात प्रेरणादायी म्हणून सदैव स्व.विठ्ठल (आण्णा) राऊत प्रेरणास्थान असून मार्गदर्शक व गुरु म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.असे त्यांनी सांगितले.



