बीड

ना. पंकजाताई मुंडेंना सावरगांव ग्रामस्थांनी दिले दसरा मेळाव्याचे निमंत्रण

ना. पंकजाताई मुंडेंना सावरगांव ग्रामस्थांनी दिले दसरा मेळाव्याचे निमंत्रण

*आपला दसरा, आपली परंपरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू*

बीड।दिनांक २१।राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांना आज सावरगांव घाट येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दसरा मेळाव्याचे रितसर निमंत्रण दिले. आपला दसरा, आपली परंपरा मेळाव्याची तयारी सध्या जोरदार पणे सुरू आहे.

श्री संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संदेश सानप यांच्या नेतृत्वाखाली सावरगांव घाट येथील ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने ना. पंकजाताईंची आज बीड मध्ये भेट घेतली व सावरगांव येथे दरवर्षी होत असलेल्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले. निमंत्रण देताना ग्रामस्थ म्हणाले की,राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या मौजे सावरगांव घाट ता. पाटोदा जि. बीड येथील भगवान भक्तीगडावर दरवर्षीच्या प्रथे परंपरेप्रमाणे यंदाही आपला दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास दरवर्षी आपण उपस्थित राहून मार्गदर्शन करत असता. यावर्षी देखील 02 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यास आपण यावे आणि उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करावे अशी आम्हा सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची इच्छा आहे. या शिष्टमंडळात सर्वश्री
मुरलीधर मुकादम सानप,भागवत अप्पा सानप,जाणू दादा सानप,परमेश्वर खटके, जगनाथ सप्रे,तुळशीदास सानप,किसन सानप,मुरली नाना सानप,अश्रूबा दादा सानप, पांडुरंग सानप,राजु शिंदे,अनिल सानप,गणेश सानप आदी उपस्थित होते.

Back to top button