रजनीकांत धोत्रे यांची बौद्ध समाज सेवा संघ सभापती बिनविरोध निवड
रजनीकांत धोत्रे यांची बौद्ध समाज सेवा संघ सभापती बिनविरोध निवड
मंडणगड प्रतिनिधी
मंडणगड तालुक्यातील बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड, मुंबई या संस्थेच्या सभापती पदासाठी रजनीकांत गौराजी धोत्रे यांची बिनविरोध निवड झाली, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
मागील काही वर्षांचा कालावधी सोडल्यास त्या आधी याच संस्थेमध्ये विविध पदांवर अतिशय प्रामाणिकपणे काम केल्यानंतर आता सभापती म्हणून संपूर्ण संस्थेचे काम पाहणे आणि समाजाच्या उन्नतीला हातभार लावण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. या सगळ्यात ज्या सर्व जुन्या व नवीन सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्या सर्वांचे खूप खूप आभार मानले .
तसेच या निवडणूक कार्यक्रमाचे दुसरे उमेदवार प्रभाकर पवार यांनी उदारमानाने व संघटनेचे ऐक्य अबाधित रहावे या विचाराने मोठ्या मनाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांचेही मनापासून आभार.



