श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवींचा १८ फेब्रुवारी रोजी वार्षिक भव्य यात्रोत्सव

श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवींचा १८ फेब्रुवारी रोजी वार्षिक भव्य यात्रोत्सव
उपसंपादक प्रदीप पवार
संपूर्ण रत्नागिरी व सातारा जिल्हयात प्रसिद्ध असलेली चिपळूण तालुक्यातील शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावच्या श्री सुखाई वरदायिनी महाकाली या जागृत देवस्थानची यात्रा बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी कुंभार्ली येथे संपन्न होत आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यावेळी ही धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या देवींचा वार्षिक भव्य यात्रोत्सव म्हणजे तीन गावांसह पंचक्रोशीसाठी आनंदाची पर्वणीच असते. विशेषतः तिन गावे स्थानिकांसह चाकरमान्यांनी फुलून जातात. या यात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सुंदर सजावटीने सजवण्यात येते. या देवींच्या आशीर्वादाने शिरगाव, कुंभार्ली, पोफळी ही तीन गावे एका कुटुंबाप्रमाणे अनेक वर्षे एकत्रीत आहेत. या वार्षिक भव्य यात्रोत्सवाच्या निमित्ताने बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी कुंभार्ली येथे सकाळी ७ ते ९ वाजता देवीला अभिषेक व रुपी लावणे, सकाळी ९ ते १० देवींची पूजा व आरती, सकाळी १० ते ११ लाट चढवणे, सकाळी १२ ते २ अन्नप्रसाद, सकाळी ११ ते २ श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल शिरगाव, समर्थ रक्तपेढी डेरवण आणि महाकाली देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दुपारी ३ ते ४ मांड भरणे, लाट प्रदक्षिणा, सायंकाळी ४ ते वाजता पारंपारिक ढोल वाद्य, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, सायंकाळी ६ वाजता कबड्डीचा अंतिम सामना व बक्षीस समारंभ, सायंकाळी ७ ते रात्री वाजता ८ मयूर उबाळे प्रस्तुत जय जगदंबा संबळ पथक, रात्रो १० नंतर वसंतराव वाडेकर यांचा लोकनाट्य तमाशा असे भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. देवींच्या वार्षिक भव्य यात्रोत्सवाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तीन गाव कमिटीकडून करण्यात आले आहे. भाविकांकरता चिपळूण डेपोतून खास यात्रेसाठी एसटी बसेसची सोय करण्यात आलेली आहे.



