📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेड महाविद्यालयात शाश्वत कृषी दिन साजरा.

जामखेड महाविद्यालयात शाश्वत कृषी दिन साजरा.

जामखेड प्रतिनिधी – दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी चे जामखेड महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि आय. क्यू. ए. सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. पुराणे एस.जी होते तर प्रमुख मार्गदर्शक घुले साहेब ( तालुका कृषी अधिकारी जामखेड) व गोलेकर साहेब (तंत्रज्ञान सहाय्यक )होते. प्रमुख उपस्थिती मा.श्री. उगले सुनील, उगले बबन, घुमरे सुभाष,प्रा फलके ए.बी (कला शाखाप्रमुख), डॉ.केळकर जी. डी.( एन. सी. सी. विभागप्रमुख), प्रा. मोहळकर एस. डी (अर्थशास्त्र विभागप्रमुख), डॉ. मोहिते ए. डी (क्रीडा संचालक), दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.श्री. सुनील उगले(यशस्वी अडत व्यापारी) यावेळी बोलतांना म्हणाले की. शेतकरी हा पीक उत्पादन घेतो पण विक्री करण्याचा त्याला अधिकार नसतो त्यासाठी शेतकऱ्याने अन्नधान्य विक्रीचे कौशल्य आत्मसात करावे. आजच्या काळात मराठी माणूस फार पाठीमागे राहिला आहे. असे खंत व्यक्त केली.
मा.श्री. उगले बबन(प्रगतशील शेतकरी – ऊस उत्पादनातील तज्ञ) यांनी शेतकरी जीवनातील दारिद्र्य, दुःख हे दारुमुळे निर्माण होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी व्यसनापासून दूर राहून आधुनिक प्रकारे शेती करावी असे सांगितले.
मा. श्री. सुभाष घुमरे(प्रगतशील शेतकरी – फळबाग व शेतीमाल विक्रीचे कौशल्य प्राप्त) यांनी शेतकऱ्याने नेहमी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी प्रयत्न करावा, तसेच मुलींनी शेती विषयी मनात न्यूनगंड निर्माण होऊन न देता. शेतकरी नवरा करावा असा सल्ला दिला.
मा. श्री.गोलेकर साहेब यांनी गटशेती, कंपनी शेती यांचे फायदे सविस्तर सांगून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आव्हान केले.
मा.श्री. घुले साहेब यांनी कृषी खात्यातील अनेक योजना शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असुन शेतीचा विकास करण्यासाठी उपयोग करावा.आज आपण भारतरत्न डॉ. एम. एस स्वामीनाथन यांची जयंती साजरी करत आहोत. या निमित्त ‘आपल्या शेतीचे रासायनिक खतापासून रक्षण करून पुढच्या पिढीच्या हाती सुपीक शेती देऊ’ असा संकल्प यावेळी केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाॅ. पुराणे एस. जी. यांनी कृषी क्षेत्र हे मानवी जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे हे पटवून देताना त्यांनी १९७२ साली निर्माण झालेल्या दुष्काळाची आठवण काढली. अमेरिकेकडून प्राप्त झालेल्या लाल ज्वारीचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. आज भारत अन्नधान्य बाबत स्वयंपूर्ण आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे मत यावेळी मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.मोहळकर एस. डी यांनी केले आभार प्रा. चव्हाण. पी. बी यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चोरडिया एन.एस यांनी केले. छायांकन प्रा. महारनवर डी.एस यांनी केले.
तसेच सहकार्य प्रा.भाकरे आर. ए, प्रा.कांबळे आर.यांचे लाभले.

Back to top button