📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

एकीकडे स्मशानभूमी अभावी उघड्यावर अंत्यसंस्कार तर दुसरीकडे ८ वर्षांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीत एकही अंत्यविधी नाही ; जिल्हा प्रशासनाचा अजब कारभार ;  पैसा जनतेचा फायदा गुत्तेदाराचा ; बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील प्रकार :- डॉ.गणेश ढवळे 

एकीकडे स्मशानभूमी अभावी उघड्यावर अंत्यसंस्कार तर दुसरीकडे ८ वर्षांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीत एकही अंत्यविधी नाही ; जिल्हा प्रशासनाचा अजब कारभार ;  पैसा जनतेचा फायदा गुत्तेदाराचा ; बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील प्रकार :- डॉ.गणेश ढवळे
—
बीड:- ( दि.०८ ) बीड जिल्ह्यातील १३९४ गावांपैकी तब्बल ६५६ गावांमध्ये अजुनही स्मशानभूमीच अस्तित्वात नाही तर काही ठिकाणी बांधलेल्या स्मशानभूमीची अंत्यंत दुरावस्था असुन बांधकाम ढासळलेल्या स्थितीत तर वादळी वाऱ्यासह पावसात पत्रे उडून गेल्याने निवारा नाही त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी अडचण निर्माण होते. मृतदेहाची विटंबना होते. काही गावांमध्ये अंत्यविधी रोखल्याने मृतदेह शासकीय कार्यालयासमोर आणुन ठेवल्याच्या घटनांत वाढ होत आहे. दुसरीकडे मात्र जिल्हा प्रशासनाचा अजब कारभार पहावयास मिळत असुन बीड तालुक्यातील महाजनवाडी येथे ८ वर्षापुर्वी ६ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत अद्याप एकही अंत्यसंस्कार विधी झाला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वापरात नसलेली स्मशानभूमी जिल्हा प्रशासनाने केवळ गुत्तेदार पोसण्यासाठीच बांधली का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे.
गावापासून अडीच किलोमीटर गायरानात स्मशानभूमी बांधल्याने वापरात नाही :- विश्वंभर गिरी ( सरपंच महाजनवाडी)
—
बीड तालुक्यातील महाजनवाडी गावची लोकसंख्या २२०० च्या आसपास असुन पुर्वी गावात चिंचेच्या झाडाखाली असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण होऊन घरे,गायगोठे बांधण्यात आले आहेत. त्याठिकाणी स्मशानभूमीची जागा शिल्लक नसल्याने तत्कालीन गावपुढा-यांनी गावापासून अडीच किलोमीटर दुर असलेल्या गायरान जमिनीत स्मशानभूमीचे बांधकाम केलेले आहे. बहुतांश शेतकरी आपल्या शेतात अंत्यविधी करतात तर भुमिहीन असणारे गावालगत नदीच्या ओढ्यात अंत्यविधी करतात. अडीच किलोमीटर गावाच्या बाहेर अंत्यविधीसाठी कोणीही याठिकाणी येत नाही. स्मशानभूमीत ठेवण्यात आलेली लोखंडी जाळी सुद्धा नंतर काढुन नेण्यात आली. त्यामुळे हि स्मशानभूमी वापराविना पडुन असल्याचे सरपंच विश्वंभर गिरी यांनी सांगितले.
स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण गंभीर प्रश्न असुन जिल्हा प्रशासन स्मशानभूमीच्या जागा सुरक्षित कराव्यात :- डॉ.गणेश ढवळे
—-
स्मशानभूमीच्या जागेवर होणारे अतिक्रमण हा गंभीर प्रश्न आहे.या अतिक्रमणामुळे स्मशानभूमीची जागा ईतर कारणासाठी वापरली जात आहे. त्यामुळे तेथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या मुलभूत हक्कावर गदा येत आहे. स्मशानभूमीच्या जागेवरून समाज आणि स्थानिक प्रशासन मध्ये संघर्ष निर्माण होतो आहे.अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी आणि जागांचा ताब घेऊन त्या सुरक्षित कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
Back to top button