📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सारोळा शाळेची यशाची परंपरा कायम…!

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सारोळा शाळेची यशाची परंपरा कायम…!

जामखेड प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथील इयत्ता पाचवीच्या वर्गातील एकूण ११ विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२५ मध्ये पात्र* ठरले असून त्यापैकी कु.समृध्दी अनिल यादव हिने जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्ती धारक होण्याचा बहुमान संपादन केला आहे.या सुयशामुळे कु.समृद्धीला प्रतिवर्षी ५०००/ रू प्रमाणे एकूण १५०००/- शिष्यवृत्ती मिळणार आहे.तसेच सदर परिक्षेत कु.अर्णवी योगेश तुपविहिरे, कु.वैष्णवी अमोल लोहार,चि.ओमराज भरत सांगळे, कु.अनन्या संदिप भवर, चि.यश अमोल कांबळे,चि. अथर्व अण्णा डोके, चि.समर्थ योगेश शेटे, कु.ज्ञानेश्वरी दत्तात्रय डोके, चि.स्वराज श्रीधर मुळे, चि.केतन अशोक काशिद हे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत.
या सर्व गुणवंत विद्यार्थी यांना मुख्याध्यापक श्री.माजीद शेख सर,वर्गशिक्षक श्री.प्रशांत होळकर सर ,मार्गदर्शक शिक्षक श्री.सोमाजी मधे सर,श्री.राहुल लिमकर सर, श्री.खंडेराव सोळंके सर, श्रीम.शबाना शेख मॅडम व श्रीम.अमृता रसाळ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परिक्षेतील उत्तुंग कामगिरीबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक सर्व शिक्षक वृंदांचे,जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय श्री.शुभम. जाधव साहेब, गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री.प्रदिप चव्हाण साहेब,जामखेड बीट शिक्षण विस्तार अधिकारी श्री.जालिंदर खताळ साहेब, केंद्रप्रमुख श्री.सुरेश मोहिते साहेब तसेच सारोळा गावच्या सरपंच सौ.रितूताई काशिद,श्री.अजयदादा काशिद,उपसरपंच श्री.हर्षद मुळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.किशोर सातपुते,उपाध्यक्ष श्री.राजेंद्र आजबे,पालक व ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन करुन भविष्यातील उज्ज्वल शैक्षणिक वाटचाली करिता मनस्वी शुभेच्छा दिल्या.

Back to top button