मुंबई

‘मनी लॉन्ड्रिंग करणारा सॅम डिसूझा एनसीबीच्या कार्यालयात का आहे?’

 

मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी’ने केला आहे. या प्रकरणानं सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिक मैदानात उतरले असून आता त्यापाठोपाठ या कारवाईवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे.

भारतीय पूजनात पक्षाचे नेते जे ईडीचा खेळ करत आहे ना त्यांनी या प्रकरणातसुद्धा मनी लॉन्ड्रिंग झाले आहे. मी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाजूला बसलेली आहे ती सॅम डिसूझा आहे. तो मुंबईतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील सर्वात मोठा खेळाडू आहे. तो मोठे राजकारणी, नेते, अधिकारी सर्वाचे मनी लॉन्ड्रिंग करतो असे म्हटले जाते. तो तिथे का बसला आहे? हा मोठा खेळ आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

‘जो साक्षीदार आहे त्याला काहीही होऊ देणार नाही. याप्रकरणाची संबंध फक्त मुंबईतच नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. प्रभाकर साईलने खुलासे करुन देशावर मोठे उपकार केले आहेत. जे देशभक्तीच्या नावाखाली याप्रकारचे काम करतात त्यांना उघड करण्याचे काम त्याने केले आहे. आतापर्यंत नवाब मलिक यांनी काही गोष्टी पुढे आल्या आहेत. मध्यातरानंतर मी खुलासे करणार आहे,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Back to top button