संपादकीय

राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’चा नारा ?

 

मुंबई | आगामी महापालिका निवडणूकींच्या पार्श्‍वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत तसेच येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे १० दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहे. त्यामुळे मनसेने सुद्धा आता कंबर कसली आहे.

यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षामध्ये मनसे पक्षाचा झेंडात बदल करण्यात आला. त्यावेळी हिंदुत्ववादाचा झेंडा हाती घेतल्याची झलक राज ठाकरेंनी दाखवली. त्यामुळे येत्या काळात मराठीच्या मुद्यासोबतच अनेक मुद्यावरून मनसे पक्ष राजकारणात उतरणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. तसेच २०२० मध्ये पक्षाचा झेंडा बदलतानाच मनसे आता हिंदुत्वाची पावलं टाकणार असल्याचे सुतोवाच राज ठाकरेंनी जाहीर केले होते.

तत्पूर्वी, गेल्याच महिन्यात जु्न्या आखाड्याच्या साध्वी कांचनगिरी यांनी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना अयोध्येचं निमंत्रण दिलं. २०२० मध्ये पक्षाचा झेंडा बदलतानाच मनसे आता हिंदुत्वाची पावलं टाकणार असल्याचे सुतोवाच राज ठाकरेंनी जाहीर केले होते. त्यानुसार राज ठाकरे हे १० दिवसांचा महाराष्ट्र दौरा प्रमाणेच त्यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

Back to top button