संपादकीय

शरद पवार- वळसे पाटील यांचा गुणरत्ने सदावर्ते यांच्याकडून एकेरी उल्लेख

 

मुंबई | | एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली. त्यानंतर आज आझाद मैदानावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर जाऊन ठाकरे सरकावर व मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करीत हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तुम्ही फार हुशार आहात. कालच्या कष्टकरांना तोडण्याचा जो तुम्ही प्रयत्न केला त्यात तुम्ही नापास झाला आहात, अशी टीका सदावर्ते यांनी केली.मुंबईत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर जाऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्या ४० बांधवांनी या लढ्यासाठी कुर्बानी दिली. शहीद झाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील, शरद पवार, विश्वास नांगरे पाटील हे आहे स्टेटचं फेल्युअर आहे. आणि याला म्हणतात या ४० आत्महत्या नव्हत्या त्या इन्स्टिट्युशनल हत्या आहेत. महाराष्ट्रटातील कष्टकरी जो एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी लढा उभा केला आहे तो मानवाधिकाराचा आहे. शरद पवार यांनी दोन दिवसांपासून ज्या प्रकारे कष्टकऱ्यांना तोडण्यासाठीचा, देवाणघेवाणीचा प्रयत्न करून देखील हा कष्टकरी तुटलेला नाही. तर तो निखर मानेने उभा आहे.

Back to top button