नाथपंथी समाजाचं तहसीलदारांना निवेदन महामंडळाला ‘शिव गोरक्षनाथ’ नाव द्यावे, नाथपंथी डवरी समाजाची मागणी

नाथपंथी समाजाचं तहसीलदारांना निवेदन
महामंडळाला ‘शिव गोरक्षनाथ’ नाव द्यावे, नाथपंथी डवरी समाजाची मागणी
जामखेड – अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी समाज महासंघाच्या वतीने तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आलं. “परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे नाव रद्द करून “शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असं नाव देण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली. तसेच सदर महामंडळाला स्वायत्त दर्जा देण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ शिंदे, संतोष शेगर, साहेबराव शिंदे, मोहन भगवान चव्हाण, मोहन शिंदे, जयप्रकाश शेगर,अरुण चव्हाण, विजय शेगर, दादाहरी सावंत, राजू शिंदे, नामदेव शिंदे, अरुण शिंदे, तानाजी चव्हाण, सावळा शिंदे, साहेबराव शेगर, सोनाबाई शेगर, सखुबाई शिंदे, भिमाबाई चव्हाण, सुलाबाई शेगर, प्रकाश शिंदे, कैलास तात्या शेगर आदी कार्यकर्ते तसेच जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



