अलकाश्री फाउंडेशनच्या वतीने मातोश्री रमाई आंबेडकर निवासी शाळेमध्ये शालेय साहित्य व शूज वाटप

अलकाश्री फाउंडेशनच्या वतीने मातोश्री रमाई आंबेडकर निवासी शाळेमध्ये शालेय साहित्य व शूज वाटप
सुहास सावंत / पुणे:-कुंजीरवाडी, थेऊर येथील मातोश्री रमाई आंबेडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रम शाळेतील मुला-मुलींना
अलकाश्री फाउंडेशनच्या वतीने अनाथ मुले मुली यांना शिक्षण देणे तसेच वयोवृद्ध बेघर आहेत, अशा सर्वाना मदत करणे आणि तळागाळातील जे लोक निराधार आहेत त्यांना मदत करणे, तसेच ज्या महिला बेघर आहेत त्यांना आधार देणं. ग्रामीण भागात समाजातील सर्व सामान्य तळागाळातील अशा सर्वांना मदत करणे, विकलांग,अंध अशा बऱ्याच लोकांना जिथं आवश्यकता आहे तिथं मदत पोहोचवणे अशा सर्व गरजू लोकांपर्यंत हा अलकाश्री फाउंडेशनचा मुख्य हेतू असल्याचे मत अलकाश्री फाउंडेशनचे दिपाली जाधव यांनी आपले मत व्यक्त केले. मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका शबाना शेख यांनी सांगितले की शाळा विना अनुदानित असून अलकाश्री फाउंडेशन वतीने विद्यार्थ्यांना मुला – मुलीसाठी स्कूलशुजचे व लेगीनचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल विद्यार्थ्यांना नवसंजीवनी मिळाल्याचे सांगितले, याप्रसंगी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका शबाना शेख, अमोल शिंदे, हनुमंत केदार, प्रवीण कांबळे, वासुदेव बारी, माधुरी सुपेकर, मीना खंडागळे आदी शिक्षक वृंद तसेच अलकाश्री फाउंडेशनचे पुजा हाणफोडे,लहु गाडेकर, आशुतोष वाकोदकर, माही शिंदे, पायल म्हस्के, कादर शेख, पत्रकार अर्जुन मेदनकर, पत्रकार सुहास सावंत, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल तुपे यांनी केले तर आभार अमोल भोसले यांनी मानले.



