बीड
चिंचाळा येथे कृषीकन्यांचे आगमन

चिंचाळा येथे कृषीकन्यांचे आगमन
आष्टी प्रतिनिधी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांचे चिंचाळा गावात आगमन झाले. यावेळी कृषीकन्या इनपा मनीषा, घुले प्रांजल, रहाडे काजल, थल्ला पावनी व थिटे संस्कृती यांचे गावातील सरपंच,ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी उत्साहात स्वागत केले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. आरसुळ तसेच कृषी कार्यानुभव कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहिणी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी विषयांची सविस्तर माहिती दिली. या कालावधीत कृषीकन्या शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणार आहेत.
यामध्ये माती परीक्षण, कीड व रोग नियंत्रण, पिकांसाठी अनुकूल वातावरण, तसेच आधुनिक शेती पद्धती यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच श्री पंडित पोकळे ,उपसरपंच ज्ञानेश्वर पोकळे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पोकळे, पशुवैद्य तज्ञ अशोक पोकळे , शिवराज पोकळे , अविनाश पोकळे, प्रणव पोकळे तसेच इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. गावातील सर्व शेतकऱ्यांनी कृषीकन्यांना भरभरून प्रतिसाद दिला.



