बीड
शाश्वत विकासाचे विश्वासार्ह शिल्पकार – आदरणीय अमरसिंह पंडित साहेब

शाश्वत विकासाचे विश्वासार्ह शिल्पकार – आदरणीय अमरसिंह पंडित साहेब
समाजाच्या जडणघडणीत काही व्यक्तिमत्वे अशी असतात की, त्यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित राहत नाही, तर ते लोकांच्या आशा -आकांक्षांचे केंद्रबिंदू बनतात. अशाच अभ्यासू, दूरदृष्टी असलेल्या आणि जनतेच्या प्रश्नांप्रती संवेदनशील नेतृत्वाचे नाव म्हणजे गेवराई तालुक्याचे माजी आमदार , जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह आदरणीय अमरसिंह पंडित साहेब.
तालुक्याचा विकासाचा पाया हा सक्षम, दूरदृष्टी असलेल्या आणि जनतेच्या प्रश्नांप्रती संवेदनशील नेतृत्वावर उभा असतो. याप्रमाणेच आपल्या कार्यातून जनतेचा विश्वास संपादन करत, विकासाला नवी दिशा देणारे आणि शाश्वत विकासावर नेहमी आग्रही असणारे असे नेतृत्व म्हणजे आदरणीय साहेब. अभ्यासूवृत्ती, चाणाक्ष निर्णयक्षमता आणि जनहितासाठी सातत्याने झटण्याची तळमळ यामुळे आज ते गेवराई तालुक्यातील नागरिकांच्या मनात एक ‘विश्वासार्ह लोकनेते’ म्हणून स्थान मिळवून आहेत.
अमरसिंह पंडित साहेब हे नाव आज तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या विकासाशी, शेतकऱ्यांच्या हिताशी आणि सामान्य नागरिकांच्या विश्वासाशी घट्ट जोडले गेले आहे. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत तात्काळ पोहोचवून त्या मार्गी लावण्याची त्यांची कार्यशैली त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. त्यामुळेच कोणतीही अडचण निर्माण झाली की नागरिकांचा पहिला विश्वास आदरणीय साहेब यांच्यावरच असतो. लोकांच्या अडचणी केवळ एकूण घेणे नव्हे तर त्या जलद गतीने सोडवणे ही त्यांची खास ओळख आहे. एखाद्या गावात पाणीटंचाई असो, वीजपुरवठ्याचा प्रश्न असो किंवा नागरिकांच्या दैनंदिन अडचणी असोत त्या प्रश्नांचे गांभीर्य ओळखून त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला जागे केले आणि नागरिकांचे प्रश्न सोडवले.
केवळ आश्वासने न देता, प्रशासनाशी थेट समन्वय साधून नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणारे लोकनेते आदरणीय साहेब म्हणजे गेवराई तालुक्याच्या सर्वांगीण आणि ‘शाश्वत विकासाचा भक्कम आधारस्तंभ’ आहेत. एक ‘अभ्यासू आणि चाणाक्ष नेतृत्व’ म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात त्यांच्याकडे पाहिले जाते.
शेतकरी हा देशाचा कणा आहे, याची जाणीव ठेवून साहेबांच्या कार्याचा केंद्रबिंदू नेहमीच बळीराजा राहिला आहे. आदरणीय साहेबांनी शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे नेहमीच विशेष लक्ष दिले. शाश्वत शेती या संकल्पनेवर त्यांचा गाढा अभ्यास आणि ठाम विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा आणि खालावलेली भूजल पातळी पुन्हा वाढावी, या उदात्त हेतूने त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळताच शिरसमार्ग निम्न पातळी बंधारा आणि केकतपांगरी साठवण तलावाचे काम शासनकडे पाठपुरावा करत पूर्ण केले.याच प्रयत्नामुळे शिरसमार्गची ओळख ‘मोसंबी हब’ म्हणून झाली.सिंदफणा नदी बारमाही पाणीदार करण्यासाठी इटकूर, अंकुटा, टाकळगाव, खुंड्रस, औरंगपूर, नाथापूर आणि नामलगाव येथील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे रूपांतर निम्न पातळी बंधाऱ्यांमध्ये करण्यासाठी साहेबांचे नेहमी शासनाकडे पाठपुरावा करणे सुरू आहे. सत्ता नसतानाही शासकीय मदतीशिवाय सामाजिक संस्थाच्या मदतीने प्रकल्प जलशारदा अंतर्गत ६७ गावातील जुन्या बंधाऱ्याचे खोलीकरण, विस्तारीकरण व सरळीकरण करत तालुक्यात जलक्रांती घडवून आणली. यामुळे पाण्याची साठवण वाढली व भूजल पुनर्भरणाला चालना मिळत अनेक शेतकऱ्यांच्या शिवारात नवसंजीवनी मिळाली. या कार्याच्या माध्यमातून साहेबांनी शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी शाश्वत विकासाचा पाया रोवला. या विकासाचा रथ आजतागायत सुरू आहे तो म्हणजे शासनाच्या “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेअंतर्गत शारदा प्रतिष्ठान व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे धानोरा , फेंडटाकळी, बंगालीपिंपळा, म्हाडुळा, गोविंदवाडी येथे सुरू असलेल्या नाला सरळीकरण, खोलीकरण व विस्तारीकरण या कामांच्या स्वरूपात. गेवराई तालुक्यात सिंचन सुविधा वाढवण्यासाठी या कार्याचा नक्कीच फायदा होणार हे जाणून साहेब स्वतः लक्ष घालत ही कामे पूर्णत्वाकडे घेऊन जात आहेत. याप्रकारे साहेबांनी संपूर्ण तालुक्यात लघुबंधारे उभारण्याची यशस्वी मोहीम राबवली. जायकवाडीसह मराठवाड्यातील इतर धरणांमध्ये वरच्या भागातून हक्काचे पाणी सोडले जावे यासाठी केलेला संघर्ष लढा , पाठपुरावा हा केवळ राजकीय नसून इथल्या मातीबद्दलच्या संवेदनशीलतेचा पुरावा आहे.
साहेबांनी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नाबाबतही नेहमीच ठोस भुमिका घेतली आहे. शेतीसाठी नियमित आणि पुरेशा प्रमाणात वीज मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत अनेक प्रश्न मार्गी लावले त्यापैकी एक म्हणजे ६३ एच. पी ,१०० एच. पी ट्रान्सफॉर्मर , सिंगल फेज, लिंकलाइन इ. कामांसाठी शासनाकडून ८ कोटी रु. निधी मंजूर करत महावितरणची कामे मार्गी लावली. यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा सुरळीत झाला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि शेती उत्पादनक्षमतेला हातभार लागला.
शेतीचा विकास हा केवळ आजपुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठीही टिकाऊ असला पाहिजे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे जलसंधारण, मृदसंधारण, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर यावर ते सातत्याने भर देतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी विधिमंडळापासून ते रस्त्यापर्यंत संघर्ष करण्याची साहेबांची तयारी असते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान जर झाले तर शासनाकडे सतत पाठपुरावा करत शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि पीक विमा मिळवून देण्यासाठी साहेब प्रयत्नांची शर्थ करतात.
केवळ शेतीच नाही, तर उद्याची सशक्त पिढी घडवण्यासाठी आदरणीय साहेबांनी गेवराई तालुक्यात जयभवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वरूपात ‘शिक्षणाची गंगा’ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत
पोहचली पाहिजे यासाठी नेहमी प्रयत्न केले व ते अविरत सुरू आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद शाळांच्या निजामकालीन मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी नवीन इमारती व्हाव्यात यासाठी साहेबांनी विधिमंडळात आवाज उठवला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद बीड कडून सर्वाधिक निधी शाळा इमारत बांधकामासाठी खर्च केला गेला. यामुळे गेवराई तालुक्यातील अनेक ठिकाणी शाळेच्या नवीन इमारती विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा युक्त शिक्षण देण्यासाठी सज्ज झाल्या. दर्जेदार शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात, त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ मिळावे, यासाठी त्यांनी शैक्षणिक सुविधा उभारण्यावर भर दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा, उपक्रम राबवत विद्यार्थ्यांवर शिक्षणासोबतच क्रीडा, संस्कार आणि सामाजिक जाणीव जोपासण्याचे कार्य साहेब करत आहेत.
‘अधिकाऱ्यांचा तालुका’ अशी गेवराई तालुक्याची राज्यात ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने साहेबांनी गेवराई शहरात सर्व सुविधांनी युक्त मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची उभारणी केली. त्यासोबतच वेळोवेळी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांचा गौरव करून युवकांना प्रोत्साहित करण्याचे कार्य साहेब करत आहेत. आधुनिक शिक्षण, अद्ययावत शाळा आणि सोयी-सुविधा तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे.
तसेच विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनाही प्रोत्साहन मिळून त्यांच्याकडून आणखी उल्लेखनीय कार्य घडावे या उद्देशाने आदरणीय साहेबांनी शारदा प्रतिष्ठान अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्काराची सुमारे १७ वर्षापूर्वी सुरुवात केली.
तालुक्याचा विकास गतिमान करायचा असेल तर सुलभ दळणवळणाची साधने असावीत यासाठी साहेबांच्या प्रयत्नातून शासनाकडून निधी उपलब्ध करत गेवराई तालुक्यात सुमारे १४० कोटी रु. जास्त रस्ते व पुल बांधकामाची कामे झाली.पांदण रस्ते विकासांतर्गत मजुरांच्या हाताला काम मिळावे या माध्यमातून सुमारे १८०० पांदण रस्त्याचे काम पूर्ण झाले.त्यामुळे अनेक गावांच्या रस्त्याचा प्रश्न सुटला व लोकांचा प्रवास सुखकर झाला. सद्यस्थितीत तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते, पुल, पाणंद रस्ते यांची कामे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने पूर्ण होत आहेत. गेवराई तालुक्याचा विकास हा तात्पुरता न राहता तो “शाश्वत” असावा, यासाठी पाणी,वीज,रस्ते आणि शिक्षण या चतु:सूत्रीवर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत आदरणीय श्री.अमरसिंह पंडित साहेबांनी तालुक्यातील गरजु नागरिकांना मदतीचा हात म्हणून त्यांच्या मुलींच्या विवाहावरील अवाढव्य खर्च व हुंडा ही प्रथा बंद व्हावी या उद्देशाने शारदा प्रतिष्ठान च्या माध्यमातून सामुहिक विवाह सोहळ्याची व्यापक चळवळ उभी केली. ती सातत्याने अंदाजे २५ वर्षापासून सुरू आहे.या माध्यमातून १५०० हून अधिक दांपत्याचे विवाह संपन्न झाले. त्यासोबतच, दिव्यांगाना आधार देण्यासाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप, कोरोना सारख्या संकटकाळात १०० बेडचे कोविड सेंटर उभारत मोफत आरोग्य उपकरणे उपलब्ध करणे. असे अनेक समाजोपयोगी उपक्रम साहेबांनी शारदा प्रतिष्ठान च्या माध्यमातून राबवले. त्याचबरोबर तालुक्यातील नागरिकांच्या घरी सुखद किंवा दुःखद प्रसंग असो साहेब नेहमी कुटुंबातील सदस्याप्रमाणे उभे असतात. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारे आणि मराठवाड्याच्या तहानलेल्या मातीला पाणी मिळवून देण्यासाठी लढा देणारे साहेब, हे खऱ्या अर्थाने या भूमीचे व नागरिकांचे ‘आधारवड’ आहेत.
साहेबांची विविध तीर्थक्षेत्रांवरती विशेष श्रद्धा आहे. त्यांनी शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील अनेक ठिकाणी विकास कामे घडवून आणली. याचे सद्यस्थितीतील उदाहरण मौजे शेकटा येथे श्री संत सदगुरू बाळूमामा मंदिर संभामडपाचे भूमिपूजन , दोन दिवसांपूर्वी साहेबांनी शिरसमार्गचे ग्रामदैवत श्री सुभान संतुआई मंदिरास भेट देऊन तेथील विकासाबद्दल गावकऱ्यांशी चर्चा केली. मंदिर परिसर विकाससाठी सदैव सोबत असण्याची ग्वाही दिली. यातून साहेबांची तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची प्रयत्नशीलता दिसून येते.
विधानसभेत, विधान परिषदेत आमदार म्हणून कार्य करत असताना त्यांनी केवळ उपस्थिती लावली नाही, तर लोकांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवला. अभ्यासपूर्ण मांडणी विषयाची सखोल जाण आणि प्रशासनाला उत्तरदायी धरण्याची क्षमता यामुळे त्यांची ओळख एक प्रभावी लोकप्रतिनिधी म्हणून निर्माण झाली. जनतेचे प्रश्न हेच आपले ध्येय असे मानून त्यांनी सभागृहात सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि तालुक्याच्या विकासाचे मुद्दे असा प्रत्येक मुद्दा ताकदीने मांडला. त्यांच्या प्रश्नांमधील अचूकता आणि चाणाक्ष विचारसरणीमुळे सरकारलाही त्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी लागते. लालफितीत अडकलेली कामे सोडून ती पूर्णत्वाकडे नेण्याची कसब साहेबांकडे आहे.
गेवराई तालुक्याचा विकास हा शाश्वत करण्यासाठी आदरणीय अमरसिंह पंडित साहेब हे नेहमी प्रयत्नशील असतात. विकास कामे करताना दीर्घकालीन परिणामांचा विचार करून नियोजनबद्ध काम करण्याची त्यांची शैली त्यांना वेगळेपण देते. एखादं काम होत असेल तरच ‘हो’ म्हणण्याच्या सवयीमुळे नागरिकांना त्यांच्यातील पारदर्शक दिसते. त्यामुळेच आज नागरिक त्यांच्याकडे केवळ नेता म्हणून नाही, तर “विकासाचा विश्वासार्ह शिल्पकार” म्हणून पाहतात.
आदरणीय अमरसिंह पंडित साहेब यांचे नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता कारण नसून ती एक समाजसेवेची अविरत चळवळ आहे. एका हातात विकासाचा आराखडा आणि दुसऱ्या हातात जनतेचा हात धरून चालणारे हे नेतृत्व खऱ्या अर्थाने तालुक्याचे भाग्यविधाते ठरले आहेत. त्यांच्या या निस्वार्थ, धोरणी आणि अभ्यासू कार्यामुळे संपूर्ण गेवराई तालुक्याला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.
त्यांचे कार्य हे केवळ विकासकामांचे उदाहरण नाही, तर लोकांसाठी झटणाऱ्या लोकनेत्याचा आदर्श आहे. अशा या लोकनेत्याचे कार्य भविष्यातही समाजाला नवी दिशा देत राहिल,यात शंका नाही.
आदरणीय अमरसिंह पंडित साहेब यांच्या बद्दल लिहिण्यासारखं आणखी भरपूर काही आहे. कारण त्यांचे जनकल्याणकारी कार्य या एका लेखांमधून पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे इथेच थांबतो.
साहेबांचा जन्मदिन हा 31 मे रोजी असतो त्यानिमित्ताने आदरणीय अमरसिंह पंडित साहेब यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा….



