संपादकीय

तुमच्याकडे चाणक्य तर आमच्याकडं तालमीतला बाप आहे’ – नवाब मलिक

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे तर दुसरीकडे मलिक यांनी तेहत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत संपूर्ण भाजपाला अंगावर घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर आज पत्रकार माध्यमाशी संवाद साधताना पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला होता.

मलिक म्हणाले की, तुमच्याकडे चाणक्य आहे, तर आमच्याकडे तालमीतला बाप आहे, अशी जहरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. ते परभणीत एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगरपालिकेतील काँग्रेसच्या १० नगरसेवकांनी मलिकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा मलिक यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी आणि भाजपात जोरदार शीतयुद्ध सुरु होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले की, परभणी हा पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने जिल्ह्यातील अनेक कामे केली. अनेक प्रश्न सोडवले आहेत, कोरोनामध्ये होम क्वारंटाईन असेल या कोविड बाबत अनेक कामे केली करण्यात आली. राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी भाजपची दडपशाही होती. अर्धे लोक तुरुंगात जातील असं ते म्हणतात मात्र आम्ही घाबरत नाही. आमच्या नेत्यांच्या मागं ईडी आणि सीबीआय लावली आहे, त्याचा सामना करु, असं मलिक म्हणाले.

Back to top button