बीड

नानासाहेब आजबे यांचे दुःखद निधन

नानासाहेब आजबे यांचे दुःखद निधन

आष्टी (प्रतिनिधी):आष्टी तालुक्यातील शिराळ येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब गंगाधर आजबे (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील नोबेल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.

नानासाहेब आजबे हे शिराळ व परिसरात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय होते. दुष्काळाच्या काळात गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी त्यांनी छावणी चालवून मोठे योगदान दिले होते. तसेच शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्येही ते नेहमी पुढाकार घेत. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, सामाजिक ऐक्य जपणे आणि सर्वसामान्यांसाठी सदैव तत्पर राहणे ही त्यांची ओळख होती.

त्यांच्या निधनाची वार्ता कळताच शिराळसह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्कार शुक्रवारी दुपारी एक वाजता धीर्डी येथे पार पडले. या वेळी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नानासाहेब आजबे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने तालुक्यातील सामाजिक कार्याची मोठी हानी झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Back to top button