बीड

बीडमध्ये भव्य अस्थिरोग शिबिर; एक्स-रे ₹२५०, CT स्कॅन ₹१००० तर MRI फक्त ₹१७५० मध्ये

बीडमध्ये भव्य अस्थिरोग शिबिर; एक्स-रे ₹२५०, CT स्कॅन ₹१००० तर MRI फक्त ₹१७५० मध्ये

बीड (प्रतिनिधी) | दि. 16 जुलै 2026 (गुरुवार)

सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी तसेच मणक्यांच्या विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल, बीड येथे गुरुवार, दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत विशेष भव्य अस्थिरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने व संत आदर्श ऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जैन सोशल फेडरेशन यांच्या वतीने आयोजित या शिबिरात अहमदनगर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन धोत्रे व त्यांची अनुभवी टीम रुग्णांची तपासणी करणार आहे.

या शिबिरात गुडघेदुखी, सांधेदुखी, हात-पाय बधिर होणे, चालताना त्रास होणे, कंबरदुखी, पाठदुखी, मणक्यांचे विकार, जुने फ्रॅक्चर तसेच सांधे झिजणे अशा विविध आजारांवर तज्ज्ञांकडून सविस्तर सल्ला व उपचार नियोजन करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, संपूर्ण गुडघा व खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गुणवत्तापूर्ण इम्प्लांटसह फक्त ₹६५,००० मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पात्र रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार असून, अपात्र रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी संदर्भात आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांची एक्स-रे तपासणी फक्त ₹२५० मध्ये करण्यात येणार आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी CT स्कॅन विशेष सवलतीच्या दरात फक्त ₹१००० मध्ये व MRI तपासणी विशेष सवलतीच्या दरात फक्त ₹१७५० मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तपासणी शुल्क केवळ ₹१०० ठेवण्यात आले असून, बीड जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्क :

📞 ९८५००७७३६१ / ८२६२००९०९

Back to top button