बीड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बीड जिल्ह्याच्या भूमीपुत्रांचे दैदीप्यमान यश ; ना. पंकजाताई मुंडेंनी केले सर्वांचे अभिनंदन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बीड जिल्ह्याच्या भूमीपुत्रांचे दैदीप्यमान यश ; ना. पंकजाताई मुंडेंनी केले सर्वांचे अभिनंदन

*जिल्ह्याची मान उंचावणारे तुमचे यश अभिमानास्पद

बीड।दिनांक ०१।:-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. जिल्ह्याची मान उंचावणारे तुमचे हे यश आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे अशा शब्दांत त्यांनी यशस्वीतांचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र शैलेश भिकाराम आंधळे (Rank 04), प्रकाशकुमार महादेव बडे (Rank14), राहुल शिवाजी तांबे (Rank 26), लक्ष्मण दिनकर गुट्टे (Rank 56), अजितसिंह मधुकर शिंदे (Rank 58), रामदास नामदेव चोले (rank90), तेजस भीमाशंकर होनराव(rank98), नितीन भोलाजी खेंगरे (Rank 139), श्रीकांत दत्तात्रय होरमाळे (Rank140). या सर्वांनी दैदिप्यमान यश संपादित करत  घवघवीत यश मिळवले आहे.

राज्यपातळीवर आपल्या जिल्ह्याची मान उंचावणारे तुमचे हे यश आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. पुढील काळात राज्यातील सर्वसामान्य नागरीकांची सेवा तुमच्या हातून घडणार आहे. सामान्यांच्या समस्या आणि सेवेला प्राथमिकता देऊन आपण राष्ट्रनिर्मितीत भरीव योगदान द्याल हा विश्वास आहे. तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशा शब्दांत ना. पंकजाताईंनी कौतुक केले आहे.
••••

Back to top button