बीड

रतन बहिरवाळ ‘मशाल’ घेऊन मैदानात; 35 वर्षांची जनसेवा रिंगणात उतरली

रतन बहिरवाळ ‘मशाल’ घेऊन मैदानात; 35 वर्षांची जनसेवा रिंगणात उतरली
बीड (प्रतिनिधी):-नगर पालिकेच्या निवडणुकीचे वातावरण सध्या शहरात असून  गेल्या 35 वर्षांपासून शहरात सामाजिक सेवेच्या माध्यमातून लोकांची कामे करणारे रतन (गुजर) बहिरवाळ यांनी वार्ड क्रमांक 13 ‘ब’ येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे   उमेदवार म्हणून ‘मशाल’ हे चिन्ह घेऊन वार्डातील नागरिकांच्या आग्रहामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.
रतन (गुजर) बहिरवाळ यांनी गेल्या 35 वर्षांपासून जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी शासनदरबारी लढा दिला तसेच जनआंदोलने केली तसेच प्रभागातील नाली, रस्ता, पाणी यांसारख्या मूलभूत समस्यांवर सातत्याने पाठपुरावा करून अनेक कामे नागरिकांच्या हितासाठी केली आहेत त्यामुळे वार्डातील नागरिकांनी केलेल्या आग्रहामुळे निवडणुक लढवत असून  पाच वर्षांसाठी जनतेचा नोकर म्हणून मला सेवा करण्याची संधी द्या आणि यासाठी एक वेळेस नगरसेवक म्हणून नगरपालिकेत मला पाठवा प्रभागातील अनेक मुलभूत तसेच पायाभूत कामे बाकी आहेत त्यामुळे एक वेळ संधी देण्याचे आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
Back to top button