संपादकीय

अभिनंदन वर्धमान राष्ट्रपतींच्या हस्ते वीरचक्र पुरस्काराने सन्मानित

 

नवी दिल्ली | हवाई दलातील अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पाकिस्तानी हवाई दलाचं अत्याधुनिक एफ-१६ विमान वर्धमान यांनी पाडलं होत. एफ-१६ जमीनदोस्त केल्यानंतर अभिनंदन यांचं विमानदेखील कोसळलं. त्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत सापडले. मात्र सुदैवानं त्यांची सुटका झाली आणि ते सुखरुप मायदेशी परतले.

देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र ही पदके देऊन सन्मानित करण्यात येते. अभिनंदन यांनी पाकिस्तानवरुद्धच्या हवाई संघर्षादरम्यान दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांच्या नावाची ‘वीरचक्र’साठी शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार आज राष्ट्रपती भवनामध्ये पार पडलेल्या समारंभामध्ये सन्मान झाला. अभिनंदन यांनी बालाकोट एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देत पाकचं अमेरिकन बनावटीचं एफ-१६ फायटर विमान पाडलं होतं. विशेष म्हणजे मिग-२१ विमानातून उड्डाण करणाऱ्या अभिनंदन यांनी एफ-१६ जमीनदोस्त केलं.

Back to top button