बीड

मिल्लीया प्रा.शा. (मुलींची) भालदारपुरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

मिल्लीया प्रा.शा. (मुलींची) भालदारपुरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शिबिरात २५० विद्यार्थी आणि ८० मातांची झाली आरोग्य तपासणी

बीड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ख्यातनाम शिक्षण संस्था अंजुमन ईशात-ए-तालीम च्या भालदार पुरा येथील मिल्लीया प्राथमिक शाळा (मुलींची) येथे विद्यार्थी व मातांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५० विद्यार्थी आणि ८० मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
भालदार पुरा येथील मिल्लीया प्राथमिक शाळेत मंगळवार दिनांक १५ जुलै २०२५ रोजी सकाळी १०ः०० ते दुपारी १ः०० वाजेपर्यंत हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा विद्यार्थ्यांसह मातांनीही मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबिरात मातांची तपासणी शहरातील सुप्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. रेश्मा पठाण यांनी केली. तर विद्यार्थ्यांची तपासणी डॉ. मसरत जहाँ खादरी यांनी केली. विशेष म्हणजे या शिबिरासाठी दोन्ही डॉक्टर्सनी कुठलेही शुल्क न आकारता विनामूल्य सेवा दिली. आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन अंजुमन ईशात-ए-तालीम संस्थेच्या सचिव खान सबिहा बेगम बाजी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका मिर्झा कनिज़ फातेमा आणि पर्यवेक्षिका रिज़वाना बेगम कादरी यांनी केले. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी हाजरा बाजी, सबीया खतीब बाजी, मसरत बाजी, निशात बाजी, शाज़ीया बाजी, नजमुसहेर बाजी, सना बाजी, अरशीया बाजी, तसलीम बाजी, सबा फातेमा बाजी, सबा अंजुम बाजी यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले.

Back to top button