बीड

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानची सचिवपदाची सूत्रे महंत तुकाराम महाराज भारती यांच्या हाती.

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानची सचिवपदाची सूत्रे महंत तुकाराम महाराज भारती यांच्या हाती.
बेलेश्वर संस्थान चे रत्न तुकाराम महाराज भारती आहेत – लक्ष्मण महाराज मेंगडे
बेलेश्वर महाराज संस्थानला महाराष्ट्रात घेऊन जावे – प्रकाश महाराज बोधले
महंत तुकाराम महाराज भारती यांची पेढेतुला
लिंबागणेश – दि- १७ (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान बेलगावची सचिव पदाची सूत्रे महंत तुकाराम महाराज भारती यांच्या हाती सोपवण्यात आले आहेत. त्यांची निवड व अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून संस्थांवर भव्य किर्तन सोहळा  संपन्न झाला. सुप्रसिद्ध कीर्तनकार एकनाथ महाराज गाडे यांचे सुंदर किर्तन झाले या कार्यक्रमाला महंत महादेवानंद भारती महाराज,श्री ह भ प महंत प्रकाश महाराज बोधले, श्री ह भ प महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, श्री ह भ प महंत जनार्दन महाराज शिंदे, श्री महामंडलेश्वर १००८ स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वतीजी, वैराग्यमूर्ती रामकृष्ण रंधवे बापू , महंत धर्मराज महाराज सामनगावकर, ताल मार्तंड केशव महाराज जगदाळे गुरुजी,श्री ह भ प भक्तीदास महाराज शिंदे,भागवताचार्य प्रेमानंद महाराज नगरकर , श्री ह भ प नाना महाराज कदम, श्री ह भ प सुरेश महाराज जाधव, श्री ह भ प नवनाथ महाराज नाईकवाडे, श्री ह भ प अंगद महाराज सातपुते, रंजीत महाराज शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार गायक वादक मंडळी व हजारो भाविक उपस्थित होते..
लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान बेलगाव येथे महान तपोनिधी साधू श्री १००८ ईश्वर भारती महाराज यांच्या परंपरेचे रत्न महंत तुकाराम महाराज भारती यांच्याकडे संस्थांच्या सचिव पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील सर्व भाविक मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार एकनाथ महाराज गाडे यांचे सुश्राव्य हरिकीर्तन संपन्न झाले, त्यानंतर अभिष्टचिंतन सोहळ्याला सुरुवात झाली, सुरुवातीला पेढे तुला करण्यात आली, त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महंत तुकाराम महाराज भारती यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य सत्कार  करण्यात आला, यावेळी महादेवानंद भारती यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री ह भ प्रकाश महाराज बोधले म्हणाले की बेलेश्वर संस्थानचे अध्यात्मच सोन सांभाळणारा श्रेष्ठ असतो.महंत महादेवानंद भारती महाराज यांनी हे सांभाळून ठेवला आहे. महंत तुकाराम महाराज यांनी बेलेश्वर संस्थांची महती महाराष्ट्रभर घेऊन जावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
बेलेश्वर संस्थान हे सोनं आहे त्या कोंदणात महंत तुकाराम महाराज यांच्यासारखे रत्न मिळाल. तुकाराम महाराजांनी संस्थांची सेवा केली दिंडी तसेच भाविकांना एकत्रित करण्याचे काम केले आहे अगोदर सेवा केली त्यानंतर कारभार हाती सोपवला..भाविक भक्तांनी ही संस्थांच्या वाटचालीमध्ये सर्वांनी सहकार्य करावे. सर्व मान्यवर संतांचे आशीर्वाद तुकाराम महाराज भारती यांच्या पाठीशी आहेत. अशा भावना महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी व्यक्त केल्या..
सेवाभावातून बेलेश्वर संस्थांची महती आणि विकासही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. निस्वार्थपणाने परमार्थासाठी जीवन समर्पित करणारे महात्मे मिळाल्याने देवस्थानची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे.. असं श्री महामंडलेश्वर १००८ स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वतीजी यांनी सांगितलं. सर्व संत महंत मान्यवरांच्या आशीर्वादानंतर महंत तुकाराम महाराज भारती यांनी सर्व उपस्थित यांचे आभार मानले व सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ठोसर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील तरुण मंडळी, मोठे कष्ट घेतले. कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व गावचे सरपंच प्रतिष्ठित मंडळी आणि भक्त मंडळी उपस्थित होते..
Back to top button