बीड

“माजलगावात उमेदवारांची चढाओढ  जयसिंह सोळंके लाट कायम, तर मोहन जगताप शांत!”

“माजलगावात उमेदवारांची चढाओढ  जयसिंह सोळंके लाट कायम, तर मोहन जगताप शांत!”
 “आडसकर गटात नाराजी, तरुणाई जयसिंह सोळंके मागे  माजलगावच्या राजकारणात नव्या युगाची चाहूल!”
सुहास सावंत / माजलगाव -माजलगाव मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक गटात उत्सुकता, चर्चा आणि समीकरणांचे गणित सुरू आहे. याच दरम्यान जयसिंह  सोळंके यांच्या नेतृत्वात तरुणांची मोठी लाट निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तरुण कार्यकर्त्यांची संघटना अधिक बळकट होत असून, गावागावात बैठका आणि प्रचारयोजना वेगाने सुरू आहेत.
जयसिंह सोळंके संघटित नेतृत्वाने तरुणाईला नव्या दिशेने चालना दिली आहे. त्यांच्या सभोवती एकजूट, विश्वास आणि प्रामाणिकतेचे वातावरण दिसून येत आहे. तरुण मतदारांमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आता “स्थानिक आणि लढाऊ नेतृत्व” म्हणून केला जात आहे. “या वेळी जयसिंह भैयांचा गट निर्णायक ठरेल,” असे स्पष्टपणे बोलले जाऊ लागले आहे.दरम्यान, दोनवेळा आमदारकीच्या निवडणुकीत अपयश पत्करलेल्या रमेश आडसकर यांच्या गटात मोठी नाराजी उसळलेली आहे. आडसकर साहेबांनी मतदारसंघातील राजकीय हालचालींवर मागे हटल्याने त्यांचे अनेक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. काहीजण म्हणतात, “साहेबांनी वेळेवर नेतृत्व केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती.” अनेक कार्यकर्ते आता जयसिंह सोळंके यांच्या संपर्कात असून, “काम करणाऱ्या नेत्याला पाठबळ देऊ,” अशी भूमिका त्यांनी घेतल्याचं बोललं जात आहे.
या बदलत्या परिस्थितीत आडसकर गटातील निष्ठावान कार्यकर्त्यांचा ओघ हळूहळू जयसिंह सोळंके यांच्या कडे वळत आहे. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे नव्याने लिहिली जात आहेत.दुसरीकडे, मोहन जगताप यांच्या गटातील शांतता अजूनही कायम आहे. काही वर्षांपूर्वी सक्रीय असलेले कार्यकर्ते आता निष्क्रिय झाले असून, जगताप साहेब स्वतःही राजकीय रणांगणापासून दूर असल्याचे दिसते. यामुळे त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. “साहेब या निवडणुकीत उतरतील की नाही?” असा प्रश्न प्रत्येक ठिकाणी उपस्थित होतो आहे.
माजलगाव मतदारसंघात सध्या तीन वेगवेगळ्या प्रवाहांची चढाओढ सुरू आहे
एकीकडे जयसिंह सोळंके यांचे उर्जावान तरुणाई,दुसरीकडे आडसकर गटातील नाराज पण अनुभवी कार्यकर्ते,
आणि तिसरीकडे जगताप गटाची शांत पण निरीक्षणात्मक भूमिका.
या तिन्ही प्रवाहांनी माजलगावच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. गावागावात चर्चा रंगल्या आहेत  “जुनं नेतृत्व हळूहळू हरवतंय, आणि जयसिंह सोळंकेच्या नेतृत्वाखाली माजलगाव नव्या युगाकडे चाललं आहे.”
एकंदरीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजलगावातील राजकीय समीकरणं दिवसेंदिवस बदलत आहेत.
सत्ता कोणाची? हे अजून स्पष्ट नाही, पण जनतेतून येणारा आवाज मात्र एकच
 “या वेळची निवडणूक जयसिंह सोळंके च्या लाटेवर जाणार हे नक्की!”
Back to top button