ब्रेकिंगमुंबईराजकीय

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर, या दोन नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर होणार चर्चा ?

 

मुंबई | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही पोहोचल्याने बैठकीत काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काही वेळा पूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची मॅरेथॉन बैठक होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित आहेत.

मागच्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घर, कार्यालयांवर धाडी पडल्या आहेत. एक दोन दिवस नाही तर सहा सहा दिवस आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे मारले आहेत. तसेच भाजपचे नेते या कारवाईत बरंच घबाड सापडल्याचा दावाही करत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांदरम्यान चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button