संपादकीय

‘दी़ड फूटी उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झाला आहे’

 

खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा नुकताच विवाह पार पडला. यावेळी संगीताच्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत डान्स केला होता.
याच मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजप नेते निलेश राणे यांनीही राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला होता. आता पुन्हा राष्ट्रवादीच्या एका नेत्याने निलेश राणे यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी निलेश राणेंवर टीका करताना दी़ड फूटी उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झाला आहे वाटतं, असा खोचक टोला लगावला आहे. पुढे त्यांनी ट्विटमध्ये निलेश राणेंवर, कोणाही बद्दल दोन्ही हातांनी बोंंबलत बसण्यापलीकडे काही कतृत्व नाही, असा घणाघात देखील केला आहे.

निलेश राणे यांनी संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंवर टिका करताना, ‘दारूवरची एक्साईज ड्युटी कमी करण्याचं कारण आता समजलं. शेतकरी कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करत आहेत. दोन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं करणारं सरकार कसं जनतेच्या छातीवर नाचतं. याचं उदाहरण आहे हे,’ अशी टीका केली होती. या टीकेला आता निलेश राणे काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Back to top button