बीड

बीड ते नाळवंडी रस्त्याच्या निकृष्ट कामावरून भाजप युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर आक्रमक

बीड ते नाळवंडी रस्त्याच्या निकृष्ट कामावरून भाजप युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर आक्रमक
काम दर्जेदार होणार नसेल तर बंद पाडण्याचा इशारा
बीड (प्रतिनिधी)
दि.१६ : शहराजवळील नाळवंडी नाका ते नाळवंडी रस्त्याचा प्रश्न गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केली. त्यानंतर आता जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर झाला. मात्र सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी होत्या. या परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी क्रेशरची जड वाहतूक सुरू असल्यामुळे सध्या होत असलेले काम फार काळ टिकणार नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी (दि.१६) रस्त्याची पाहणी केली. काम दर्जेदार होणार नसेल तर बंद पाडण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी इंजि.चोपडे व पोकळे यांना कामाच्या दर्जाबाबत सूचना केल्या. शासनाच्या निकषांनुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने काम न झाल्यास सदर काम तात्काळ बंद पाडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी उध्दवराव मेहेत्रे, भाऊसाहेब सुरवसे, लक्ष्मीआई तांडाचे सरपंच स्वरूप राठोड (नाळवंडी), गणेश राऊत, जुजगव्हानचे सरपंच रवी गंगावणे, संजय बापू काळे, आत्माराम सोनवणे, अशोक सोनवणे, नामदेव म्हेत्रे, रोहित राऊत, राघोजी राऊत, राजू पटेल, बाळू आमटे, घोडके, अभिमान गुंदेकर, विकास यादव, प्रशांत जाधव, मधुकर राऊत, दत्तप्रसाद सानप, बाबासाहेब काळे, युनूस शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी पुढील टप्प्यात हा रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाचा करून द्यावा, तसेच या कामासाठी पाठपुरावा करावा, अशीही मागणी केली.
Back to top button