📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) श्रीवर्धन तालुक्यात पक्षबांधणीला वेग; दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे उपजिल्हा अध्यक्ष फैजल पोपरे यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) श्रीवर्धन तालुक्यात पक्षबांधणीला वेग; दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे उपजिल्हा अध्यक्ष फैजल पोपरे यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!
श्रीवर्धन (संदेश घोलप):
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) श्रीवर्धन तालुक्यातील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी विविध स्तरांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्रीवर्धन तालुकाध्यक्ष मुद्रास तोंडेकर आणि तालुका सचिव संदेश कातळकर यांच्या नेतृत्वाखाली या नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. आगामी काळात तालुक्यातील स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि पक्षाचे ध्येय-धोरण घरोघरी पोहोचवण्यासाठी या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नियुक्त करण्यात आलेले नवीन पदाधिकारी:
वैभव अरुण खैरै – उपतालुका अध्यक्ष, बागमांडले गट
विनोद पांडुरंग रिकामे – विभाग अध्यक्ष, बागमांडले गण
कौस्तुभ अनिल जावळेकर – तालुका अध्यक्ष, वाहतूक सेना
रुपेश शांताराम मयेकर – सहसचिव, श्रीवर्धन तालुका
अंकित रमेश तोडणकर – विभाग अध्यक्ष, वाळवटी गण
अमोल सदानंद करणेकर – उपशहर अध्यक्ष, श्रीवर्धन
मयूर विलास वैद्य – शाखा अध्यक्ष, रानवली
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे काम करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष मुद्रास तोंडेकर आणि तालुका सचिव संदेश कातळकर यांनी केले.
या निवडीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून सर्व स्तरातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Back to top button