बीड

खेमानंद इंग्लिश स्कूलचा दहावीचा उत्कृष्ट निकाल

खेमानंद इंग्लिश स्कूलचा दहावीचा उत्कृष्ट निकाल

जामखेड : शहरातील स्व.हशुजी अडवाणी एज्युकेशन सोसायटी संचलित खेमानंद इंग्लिश स्कूल चा एसएससी बोर्ड परीक्षा २०२६ चा निकाल उत्कृष्ट लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

यामध्ये तनिष्का गुंदेचा या विद्यार्थिनीने ९६.४० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला तर जामखेड तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला तसेच सुगंधा देशमुख व हुमेरा पांगारकर यांनी प्रत्येकी ९५.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला, तर वैभवी मोरे हिने ९५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

याशिवाय साक्षी सांगळे (९४.८०), अनुष्का गर्जे (९४.४०), सृष्टी घुमरे (९३.६०), सानिया पठाण (९३.४०), आफरीन शेख (९३.४०), नमन कदम (९३), कुंदन खंदारे (९२.८०), पूजा कोल्हे (९२.६०), शिवानी साळुंखे (९२), रिद्धी गुप्ता (९०.८०) व तेजस्विनी टेकाळे (९०.६०) यांनीही उल्लेखनीय यश मिळविले. पूजा कोल्हे हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविले.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सदाशिवराव लोखंडे, उपाध्यक्ष विजय पवार, सचिव सतिश शिंदे, संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक सुब्रमण्यम वेल, उपप्राचार्य अमोल ढाळे आदी शिक्षक व पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Back to top button