📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

श्री बंकटस्वामी महाविद्यालयाची विभागीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड—सत्कार समारंभात मान्यवरांचे मार्गदर्शन  

श्री बंकटस्वामी महाविद्यालयाची विभागीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड—सत्कार समारंभात मान्यवरांचे मार्गदर्शन

बीड प्रतिनिधी दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांची विभागीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.या समारंभात निवड झालेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या सचिव माननीय सौ.सरोज गोपाळराव सोंडगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे, तसेच कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. ब्रम्हनाथ मेंगडे उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंचा सत्कार करून त्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.सत्कारप्रसंगी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या सचिव सौ. सरोज गोपाळराव सोंडगे यांनी सांगितले की,“महाविद्यालयाचा नावलौकिक अशा प्रतिभावान विद्यार्थ्यांमुळेच वाढत असतो. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे गुरु मिळाले तर यश निश्चित असते. आपण नेहमी सकारात्मक विचार ठेवून परिश्रमपूर्वक काम केले पाहिजे; यश आपोआप मिळते.”तसेच त्यांनी सर्व खेळाडूंना आगामी स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य खेळाडू, विद्यार्थी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button