जामखेड शहराच्या विकासासाठी एकहाती सत्ता द्या : आशाताई शिंदे

जामखेड शहराच्या विकासासाठी एकहाती सत्ता द्या : आशाताई शिंदे
हर्षद काळे व लता गायकवाड यांच्या प्रचारार्थ ; प्रभाग क्रमांक ५ मध्ये काॅर्नर सभा
जामखेड (प्रतिनिधी): जामखेड नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी तसेच प्रभाग क्रमांक ५ मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार हर्षद भाऊसाहेब काळे व लता संदीप गायकवाड नगरसेवक पदाकरिता निवडणूक लढवत आहेत.त्यांच्या प्रचारार्थ आयोजित काॅर्नर सभा संपन्न झाली. या सभेसाठी प्रा.राम शिंदे यांच्या सौभाग्यवती माजी सभापती आशाताई राम शिंदे या उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना माजी सभापती आशाताई शिंदे म्हणाल्या की,लाईट, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा आणि महिलांची सुरक्षितता हा आपल्या जामखेड शहरातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. ही कामे वेळेत आणि सक्षमपणे पूर्ण करण्यासाठी बहुमताचा ठराव आवश्यक असतो. म्हणूनच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकहाती सत्ता द्या.आपली खरी काळजी आपल्याच माणसाला असते, म्हणून आपण भाजपाच्या नगराध्यक्षांसह सर्व २४ उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. जामखेडमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची ताकद तुमच्या मतात आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवार हर्षद काळे यांच्या मातोश्री लक्ष्मी पवार यांचे महिलांचे संघटन मजबूत आहे . सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पवार यांनी जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून लोकांना हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.



