📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा – डीवायएसपी संतोष खाडे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा – डीवायएसपी संतोष खाडे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

ल.ना.होशिंग विद्यालयात संतोष खाडेंचा सत्कार

मोबाईल दूर ठेवा, ग्रंथालय जवळ ठेवा – संतोष खाडे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

जामखेड (प्रतिनिधी) – प्रॅक्टिकल व्हा, ध्येय ठरवा आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा, असा प्रेरणादायी संदेश अहिल्यागरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. संतोष खाडे यांनी दिला. दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल.ना. होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवासाची प्रेरणादायक कहाणी उलगडली.

या प्रसंगी विद्यालयाच्या वतीने खाडे यांचा सत्कार करण्यात आला. कलाशिक्षक मुकुंद राऊत यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास रेखाचित्र भेट दिले. खाडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला देत, अभ्यासासाठी ग्रंथालयाचा उपयोग करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “मी माझ्या आयुष्यात आई-वडिलांचा कोयता बंद करण्याचे ध्येय घेतले होते. त्यासाठी प्रामाणिक मेहनत घेतली आणि आज मी डीवायएसपी पदावर आहे,” असे खाडे म्हणाले.

कार्यक्रमास नगरसेवक व विद्यालयाचे माजी विद्यार्थी अमित चिंतामणी, संस्थेचे माजी खजिनदार राजेश मोरे,प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, ॲड. प्रविण सानप, काकासाहेब गर्जे, गणेश काळे, शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया घायतडक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी खाडे यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी आपल्या मनोगतात खाडे यांच्या कार्यशैलीचा गौरव करत “ग्रामीण भागातील तरुणही मेहनतीच्या जोरावर मोठ्या पदावर पोहोचू शकतो,” असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र डहाळे, भरत लहाने, बबन राठोड, पोपट जगदाळे, कैलास वराट, विशाल पोले, उमाकांत कुलकर्णी, रोहित घोडेस्वार, किशोर कुलकर्णी, आदित्य देशमुख, साई भोसले, स्वप्निल जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे यांनी केले.

Back to top button