BTS परीक्षेत तेलंगशी शाळेतील ऋत्वी धस राज्य गुणवत्ता यादीत..

BTS परीक्षेत तेलंगशी शाळेतील ऋत्वी धस राज्य गुणवत्ता यादीत..
केंद्रप्रमुख केशव गायकवाड यांच्या हस्ते ऋत्वीचा यथोचित सन्मान
जामखेड प्रतिनिधी – दि.१८जामखेड तालुक्यातील खर्डा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तेलंगशी शाळेतील चिमुकली ऋत्वी धस हिने भारत टॅलेंट सर्च परीक्षा (BTS) या राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत इ.पहिलीची विद्यार्थीनी ऋत्वी रविंद्र धस हिने घवघवीत यश मिळवले आहे.ऋत्वीने 150 पैकी 128 गुण घेऊन महाराष्ट्रातून 17वा येण्याचा बहुमान मिळविला आहे.तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख आदरणीय केशव (तात्या)गायकवाड साहेब यांनी तिचे कौतुक केले आहे.स्पर्धा परीक्षेतील ऋत्वीची तयारी उत्तम असून अभ्यासात असेच सातत्य ठेवल्यास नक्कीच यश मिळेल असे सांगून स्वयंप्रेरणा घेऊन सर्वांनी अभ्यास करण्याचा कानमंञ ही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी मुख्याध्यापक संतोष गोरे यांच्यासह सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते.ऋत्वीच्या या यशाबद्दल सर्वच क्षेञातून तिचे अभिनंदन होत आहे.



