संपादकीय

महाराष्ट्रातील माकडांना शेपट्या आपटत नाचायची गरज नव्हती पण….

 

मुंबई | महाराष्ट्रात काही दिवसांपासून सुरु असलेल्या सुरु असलेल्या हिंसा आणि जाळपोळीबाबत आज शिवसेनेचं मुखपत्र सामनातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून आरोपही लावण्यात आला आहेत. तसेच, महाराष्ट्रात दंगली, हिंसाचार घडविण्याइतके बळ रझा अकादमीचे नाही, पण त्या मौलवींच्या खांद्यावर बंदुका ठेवून दुसरेच कोणी महाराष्ट्राचे वातावरण नासवत आहे काय?, असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, “त्रिपुरा प्रकरणात रझा अकादमीचीच महाराष्ट्रात ‘बांगबाजी’ सुरू झाली आहे. महाराष्ट्रात दंगली, हिंसाचार घडविण्याइतके बळ रझा अकादमीचे नाही, पण त्या मौलवींच्या खांद्यावर बंदुका ठेवून दुसरेच कोणी महाराष्ट्राचे वातावरण नासवत आहे काय? त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळण्यात आली नाही असे त्रिपुराचे सरकार म्हणते. ते खरे मानले तरी प्रश्न निर्माण होतो

तसेच बांगलादेशातील घटनेवरून त्रिपुरात मोर्चे काढण्याचे कारण काय? आणि शेवटचा ताजा कलम असा की, ज्यांनी त्रिपुरात मोर्चे काढून वातावरण बिघडविले, त्यांना बाजूच्या मणिपुरातील घटनांचे सोयरसुतक का असू नये? मणिपुरात दहशतवाद्यांनी अमानुष हल्ला करून कर्नल अनुज, त्यांची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलास ठार केले. चार जवानही त्या हल्ल्यात शहीद झाले. या घटनेचा निषेध करून मोर्चा काढावा असे कोणाला का वाटू नये?”

“त्रिपुरातील घटनांचे महाराष्ट्रात पडसाद उमटावेत व त्यातून जाळपोळ, हिंसाचार घडावा हे चिंताजनक आहे. मराठवाड्यातील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या, पण अमरावती शहरात चार दिवसांची संचारबंदी लागू करावी लागली, इतके प्रकरण हाताबाहेर गेले. परिस्थिती आता नियंत्रणात आहे असे सरकारतर्फे सांगण्यात आले, पण मुळात परिस्थिती हाताबाहेर का गेली? हा प्रश्न आहे.” , असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

Back to top button