📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
मुंबई

पवारांपाठोपाठ मंत्री अशोक चव्हाण यांच्या सरकार कारखान्यावर ईडीची करडी नजर

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील अनेक मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाई केली होती. अनेकांच्या कार्यालयाने आणि घरावर आयकर आणि ईडीने छापा टाकला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशि संबंधित कारखान्यांवर छापा टाकल्यानंतर आता काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित कारखाने ईडीच्या रडारवर आले आहेत.

मंत्री अशोक चव्हाण यांच्या संबंधित साखर कारखान्यांना बुलढाणा अर्बन पतसंस्थेने कर्ज पुरवठा केलेला आहे. सध्या या पतसंस्थेची चौकशी आयकर विभागाकडून केली जात आहे. यात बुलढाणा अर्बन पतसंस्थेने किती कर्ज पुरवठा केला. यासह दिलेल्या कर्जाची आयकर पथकाकडून चौकशी सुरु आहे. बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार बुलढाणा अर्बन पतसंस्थेने अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील चार कारखान्यांना कर्ज दिले आहे. या चार कारखान्यांसंदर्भात ही चौकशी केली जात आहे. गेल्या २४ तासापासून पथक चौकशी करत आहेत. सुभाष शुगर हातगाव, एव व्ही शुगर उमरी आणि भाऊराव शुगर १, भाऊराव शुगर २ हे नांदेड येथील चार कारखाने आहेत. या कारखान्यांना दिलेल्या कर्जाशी संबंधित आयकर पथक चौकशी केली जात आहे.

Back to top button