मुंबई

ठाकरे -पवारांच्या इशाऱ्यावर मलिक समीर वानखेडे यांची बदनामी करतायत

 

मुंबई | मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप लगावले आहे. यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. समीर वानखेडे यांची बाजू घेत भाजपकडून मलिकांसह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांवर टीका करण्यात येत आहे

यातच आता समीर वानखेडे यांचयव्हर लागवण्यात आलेले आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सांगण्यावरून नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर टीका करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला असून, समीर वानखेडे यांच्या पत्नीशी माझे बोलणे झाले आहे. ते आणि त्यांचे सासरे मला भेटायला येणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. जात काढली जाते, बाप काढला जातो, हे चुकीचे असून, ठाकरे सरकार चुकीचे वागत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना हे शोभत नाही. नवाब मलिक यांनी कोर्टात जावे. कोर्ट काय तो निर्णय घेईल. तुम्ही दिशाभूल का करत आहात, अशी विचारणा करत तुमचे घोटाळे बाहेर काढल्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी समीर वानखेडेंना टार्गेट केले जात आहे, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.

Back to top button