संपादकीय

रावसाहेब दानवे- चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये दाखल

 

नाशिक | नाशिक महानगर पालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच मनसे, शविसेना पाठोपाठ भाजपने सुद्धा जोरदार हालचाली सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे, तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सातपूर येथील भाजप नगरसेवक दिनकर पाटील यांनी महापालिकेच्या शाळा इमारतीचे लोकार्पण कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झालेले अवजड उद्योग मंत्री नारायण राणे, आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सत्कार आयोजित केला आहे. आज सकाळी दानवे आणि चंद्रकांत पाटील दोघेही नाशिक मध्ये दाखल झाले.

सदर कार्यक्रमास डॉ. भारती पवार या देखील उपस्थित असून नारायण राणे मात्र दाखल झालेले नाहीत. दरम्यान, दुपारी चंद्रकांत पाटील हे रामायण या निवासस्थानी सीएनजी गॅस पुरवणाऱ्या एमएनजीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहेत. तर दुपारी तीन वाजता दानवे आणि चंद्रकांत पाटील वसंत स्मृती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Back to top button