संपादकीय

या कारणासाठी ‘केजीएफ २’ टीमची आमिर खानने मागितली माफी

 

अभिनेता आमिर खानचा खान आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्डा’च्या शुटींगची चर्चा जोरदार सुरू आहे. दरवर्षी आमिरचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात.कोरोना महामारीच्या संकटामुळे ‘लाल सिंह चड्डा’ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नाही. मात्र अमीरच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. कारण आमिरचा हा चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्समुळे रिलीजला उशीर होत असल्याचे अमीरने सांगितले आहे.

विशेष म्हणजे आमिरच्या या चित्रपटासोबतच अभिनेता यशचा ‘केजीएफ २’ हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. आमिरने ‘केजीएफ २’च्या निर्मात्यांची माफी मागितली आहे. एका वृत्तात म्हटले आहे की, ‘लाल सिंग चड्ढा’ १४ एप्रिल रोजी रिलीज करण्याच्या निर्णयाबद्दल आमिरने ‘KGF 2’ आणि अभिनेता यशची माफी मागितली आहे.

त्यामुळे आमिर खानकडे दोनच पर्याय आहेत. एकत्र काम पटकन उरकून चित्रपट लवकर प्रदर्शित करणे. किंवा काम बारकाईने करून चित्रपट थोडा उशिरा प्रदर्शित करणे. आमिरला घाई आवडत नसल्याने त्याने दुसरा पर्याय निवडला होता. यामुळे आमिर खानला ‘KGF 2’ रिलीज होत असलेल्या दिवशी ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज करण्यास भाग पडले आहे. म्हणून त्याने त्याच्या टीमसोबत करार केला आहे. ज्या अंतर्गत अभिनेत्याला ‘KGF 2’ ची जाहिरात करायची आहे.

आमिर खानने मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तो ‘लाल सिंग चड्ढा’ ची रिलीज डेट निश्चित करत होता तेव्हा त्याने ‘KGF 2’ चे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांशी बोलले होते आणि त्यांची अनेकदा माफी मागितली होती. त्याने त्याच्या चित्रपटासोबतच आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचे कारण देखील स्पष्ट केले आणि तो 14 एप्रिल रोजी चित्रपटगृहात जाऊन त्याचा ‘KGF 2’ चित्रपट पाहणार असल्याचे वचन देखील दिले.

Back to top button