संपादकीय

दोन दिवसात एसटी कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास…..!

राज्यभरात एसटी विलीकरणाचा लढा एसटी कर्मचारी करत असून त्यांच्या मागण्या मान्य झाला नाहीत. गेल्या २ ते ३ आठवडे हा संप आजून आहे.आता यात एसटी प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे.त्यामुळे राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वातावरण चांगलंच चिघळलं हे. गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्या संप सुरु असून त्यांच्यामुळे प्रवाशांचीही कोंडी होत आहे. अशातच आता एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे.

राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या असतानाही ते अजूनही विलीणीकरणाच्या मागणीवर अडले आहेत. अनेक प्रयत्न करुनही कर्मचारी संप मागे घेत नसल्यानं आता एसटी प्रशासनानं आक्रमक पवित्रा घेत कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या कामावर रुजू नाही झाल्यास त्यांना कामावरुन बरखास्त करण्यात येणार असल्याचं, एसटी प्रशासनानं म्हटलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं ते जर कामावर रुजू झाले तर त्यांचंही निलंबन मागे घेण्यात येणार आहे.

Back to top button