बीड
प्रांजलताई चिंतामणींच्या हस्ते आरोग्यदूतांना दिवाळीची गोड भेट देऊन सन्मान

प्रांजलताई चिंतामणींच्या हस्ते आरोग्यदूतांना दिवाळीची गोड भेट देऊन सन्मान
अमित चिंतामणी मित्र परिवाराने जपली कृतज्ञतेची परंपरा
जामखेड प्रतिनिधी – स्वच्छतेचे महत्त्व एक गृहिणीच चांगले समजू शकते. पहाटे ५ वाजेपासून कर्मचारी शहरात स्वच्छतेचे काम करत आहेत. शहरातील रस्ते व परिसर स्वच्छ असेल तर शहराचे आरोग्यमय वातावरण राहू शकते, असे गौरवोद्गार नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आज दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी जामखेड नगर परिषदेचे आरोग्य दूत स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अमित (भाऊ) चिंतामणी मित्र परिवाराच्या वतीने ‘सेवा सुरक्षा निराधार’ ही संकल्पना घेऊन दिवाळी साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी
सांगितले की,आरोग्यदूतांशिवाय शहराचे आरोग्य अपूर्णच आहे.
यावेळी भाग्यश्रीताई लोहकरे, माधुरीताई काथवटे, आशाताई ओझर्डे, किर्तीताई चिंतामणी आदी महिला भगिनी व नगरसेवक अमित चिंतामणी मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संतोष जगताप यांनी मानले.



