📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मंत्री विखे पाटील,आ. सुरेश धस यांनी लिलावती रुग्णालयात शिवराज मनोज जरांगे यांची घेतली भेट प्रकृतीची केली विचारपूस;

मंत्री विखे पाटील,आ. सुरेश धस यांनी लिलावती रुग्णालयात शिवराज मनोज जरांगे यांची घेतली भेट प्रकृतीची केली विचारपूस;
आष्टी(प्रतिनिधी)
मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांचे चिरंजीव शिवराज जरांगे यांची महाराष्ट्राचे जलसंपदा व गोदावरी-कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश (आण्णा) धस, विधान परिषदेचे सदस्य मा. श्री. प्रसादजी लाड हे देखील उपस्थित होते. मान्यवरांनी शिवराज जरांगे यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवराज यांना लवकरात लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. तसेच योग्य उपचार सुरू असल्याची माहिती घेत, आवश्यक त्या सर्व बाबींमध्ये सहकार्य करण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
आमदार सुरेश धस यांनीही शिवराज जरांगे यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. या भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार दिला.
Back to top button