रायगड
कर्जत चार फाटा खड्ड्या संदर्भात मनसे आक्रमक

कर्जत चार फाटा खड्ड्या संदर्भात मनसे आक्रमक
कर्जत:(जयेश जाधव )मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या अवकाळी पावसामुळे कर्जत चार फाटा येथील रस्त्यावर पडलेले खड्ड्या संदर्भात आज मनसे विद्यार्थी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसन्न बनसोडे व मनसे उप तालुका अध्यक्ष भूषण राणे यांच्या आक्रमक भूमिका घेत एमएसआरडीसी आणि एम एमआरडीए अभियंता ठेकेदार यांना यांना जाब विचारत लवकरात लवकर तात्काळ खड्डे भरून रस्ता मोकळा करुन वाहनचालकांना खड्डे मुक्त प्रवास करता यावा यासाठी आज सकाळपासून एमएमआरडीए यांनी रस्त्यावर पडलेले खडे भरण्यास सुरवात केली आहे.
सदर काम चालू असताना त्याची पाहणी करण्यास प्रसन्न बनसोडे, मनसे रायगड जिल्हा सचिव अक्षय महाले, मनसे कर्जत शहर अध्यक्ष राजेश साळुंखे, मनसे विद्यार्थी सेना कर्जत शहर अध्यक्ष अवधुत अत्रे व पारस खैरे उपस्थित होते .



