ब्रेकिंग

समीर वानखेडे मुस्लीमच, जातीचा बोगस दाखला काढून मिळवली IRSची नोकरी

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काही वेळापूर्वी दोन ट्विट करुन एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या संदर्भात दोन ट्विट करून एकाच खळबळ उडवून दिली होती. यावर आता समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली होती आता पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखडे यांच्यवर आरोप लगावले आहेत.

मलिक यांनी ट्विट करत समीर दाऊद वानखेडे यांचा फ्रॉड इथून सुरू होतो असं म्हटलेय. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचं जन्माचं प्रमाणपत्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे. यामध्ये वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद के वानखेडे असं असल्याचं दिसत आहे. तर त्यांच्या आईचं नाव झहीदा असल्याचं यामध्ये दिसत आहे. तसेच समीर हे जन्मापासून आतापर्यंत मुस्लीमच आहे, असंही मलिक यांनी नमूद केलं.

पुढे मलिक म्हणाले की, मी समीर वानखेडेचे अनेक विषय समोर आणले. मात्र त्यांच्याकडून राजकीय आरोप होत असल्याचं म्हटलं आहे. भाजपवाले वानखेडेवरून हिंदू-मुस्लीम मुद्दा समोर करत आहेत. मात्र वानखेडे हे मुस्लीमच आहेत. त्यांचं जन्माचं प्रमाणपत्र मी प्रसिद्ध केलं. त्यात हे स्पष्ट दिसून येत आहे. यावर आता समीर वानखडे काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Back to top button