संपादकीय

तब्बल इतक्या नागरिकांनी सोडले भारतीय नागरिकत्व, झाले विदेशात स्थायिक

नवी दिल्ली | विदेशात राहण्याची आणि तेथे काम करून त्या देशात स्थायिक होण्याची कुणाची इच्छा नसते. जगातील लोक रोजगार किंवा अन्य कारणांनिमित्त दुसऱ्या देशात स्थायिक होतात. काही जण पुन्हा मायदेशी परततात. तर काही जण मात्र त्याच देशाचे नागरिक होतात. भारतातूनही दरवर्षी हजारो लोक शिक्षण आणि रोजगारानिमित्त विदेशात जातात. या नागरिकांबाबत आता केंद्र सरकारने महत्वाची माहिती दिली आहे.

मागील 5 वर्षांच्या काळात देशातील 6 लाखांपेक्षा जास्त लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. हे नागरिक आता विदेशात स्थायिक झाले असून त्यांनी त्या देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. तसेच येणाऱ्या काळात ही आकडेवारी आदिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विदेश मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1 कोटी 33 लाख 83 हजार 718 भारतीय नागरिक विदेशात वास्तव्यास आहेत. लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सरकारने ही माहिती दिली. यानुसार 2017 मध्ये 1,33,049 नागरिकांनी देश सोडला. सन 2018 मध्ये 1,34,561 नागरिकांनी 2019 मध्ये 1,44,017 नागरिकांनी तर 2020 मध्ये 85 हजार 248 नागरिकांनी भारतीयांनी नागरिकत्व सोडले, अशी माहिती सरकारने दिली.

Back to top button