📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जामखेडमध्ये भव्य रक्तदान शिबिर

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जामखेडमध्ये भव्य रक्तदान शिबिर

शंभुराजे कुस्ती संकुल व ब्लड स्टोरेज सेंटरचा सामाजिक उपक्रम

जामखेड प्रतिनिधी: ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या उदात्त संकल्पनेतून राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जामखेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शंभुराजे कुस्ती संकुल व जामखेड ब्लड स्टोरेज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी हे शिबिर पार पडणार आहे. समाजात सेवाभाव, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या विचारांना कृतीत उतरविण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वारकरी भूषण ह.भ.प. कैलास (महाराज) भोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने सकाळी १०.३० वाजता होणार आहे. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील तरुण, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक मंगेश (दादा) आजबे यांनी केले आहे.
सदर रक्तदान शिबिर मंगेश (दादा) आजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात, नगर रोड, जामखेड येथे होणार असून या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे. निरोगी नागरिकांनी पुढाकार घेऊन या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे व मानवतेच्या सेवेत योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात आणि हेच खरे समाजसेवेचे कार्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही मंगेश (दादा) आजबे यांनी सांगितले आहे.

Back to top button