बीड

शिक्षण व व्यसनमुक्ती ही काळाची गरज : ह.भ.प. मधुकर (महाराज) केदार

शिक्षण व व्यसनमुक्ती ही काळाची गरज : ह.भ.प. मधुकर (महाराज) केदार

जामखेडमध्ये संत जळोजी मळोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी

जामखेड प्रतिनिधी :

जामखेड शहरात दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी श्री विश्वकर्मा वंशीय सुतार समाज संघटनेच्या वतीने थोर संत श्री संत जळोजी मळोजी महाराज यांची पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सकाळी ७ ते ८ अभिषेक, ८.३० ते १० दरम्यान मिरवणूक, १० ते १२ या वेळेत ह.भ.प. मधुकर (महाराज) केदार यांचे कीर्तन तसेच शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर महाप्रसादाने सांगता झाली.

या प्रसंगी जामखेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी,अमित चिंतामणी, नगरसेवक पोपट राळेभात, मनोज कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश निमोणकर, नगरसेवक मोहन पवार, नगरसेविका नंदाताई होळकर, प्रवीण होळकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

यावेळी ह.भ.प. मधुकर (महाराज) केदार यांनी समाजप्रबोधनपर मनोगतातून संत जळोजी मळोजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. कष्ट, प्रामाणिकपणा, सेवा व एकतेच्या माध्यमातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधता येईल. शिक्षण व व्यसनमुक्ती ही काळाची गरज असून तरुणांनी संतांचे विचार आचरणात आणावेत, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक हभप पंढरीनाथ (महाराज) राजगुरू,तालुकाध्यक्ष आनंद राजगुरू, उपाध्यक्ष संजय बनगे, गणेश गवळी, सचिव प्रल्हाद राजगुरू, संघटक गणेश सुतार,अंकुश राजगुरू, नारायण राजगुरू आदी समाज बांधव तसेच तालुक्यातील सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री विठ्ठल भजनी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतिश राजगुरु, रंगनाथ राजगुरु,बाळासाहेब जिरेकर, कुमार राजगुरू, संतोष क्षिरसागर, ज्ञानेश्वर क्षिरसागर, भगवान राजगुरू आदींनी परिश्रम घेतले.

Back to top button