संपादकीय

सरकारवर आणखी दबाव आणायला हवा, अण्णा हजारे यांनी दिला कर्मचारी संघटनेला कानमंत्र !

 

मागच्या दोन आठवडयापासून सुरू असलेल्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. या संपत आपण प्रत्यक्ष संपात सहभागी होऊ शकत नसलो तरी कर्मचाऱ्यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे अण्णांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी, अण्णांनी संपातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आज १५ दिवस उलटले आहे. परिवाहन मंत्री अनिल परब यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत संपाबाबत चर्चा केली. या संपावर समन्वयाने सुवर्णमध्य कसा काढता येईल यावर चर्चा झाल्याचे समजते. तर, दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा संप अधिक तीव्र होत आहे.

अण्णा हजारे प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होणार नाहीत. मात्र, कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी शिष्टमंडळाला काही सूचना केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची तयारीही हजारे यांनी दर्शविली आहे. सरकार आणि आंदोलनकर्त्यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे. पण, आत्तापर्यंत ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही, असे अण्णांनी म्हटले आहे.

 

Back to top button